पाचोर्‍यात रोटरीतर्फे रोपटे देऊन डॉक्टर्सचा सन्मान

पाचोरा प्रतिनिधी । येथील रोटरी क्लबतर्फे डॉक्टर्स डे या दिनाचे औचित्य साधून रोपटे देऊन शहरातील डॉक्टर्सचा सन्मान करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगावच्या वतीने पाचोरा भडगाव तालुक्यातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. पाचोरा येथील स्वप्नशिल्प हॉटेलच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. भूषण मगर व सचिव डॉ. बाळकृष्ण पाटील यांनी केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीप वाघ, नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, उद्योजक मुकूंद बिल्दीकर, नगरसेवक विकास पाटील, दादाभाऊ चोधरी, डॉ सागर गरुड, डॉ भरत पाटील आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरीचे अध्यक्ष डॉ भूषण मगर -पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी अध्यक्ष राजेश मोर, चंद्रकांत लोढाया सचिव- डॉ.बाळकृष्ण पाटील, रोहन पाटील, उपाध्यक्ष- रितेश ललवानी, सहसचिव-प्रा. शिवाजी शिंदे, कोषाध्यक्ष-डॉ. अमोल जाधव, क्लब ट्रेनर-राजेश मोर व रुपेश शिंदे, डॉ. विशाल पाटील, डॉ प्रदिप पाटील, रणजित पाटील,विकास पाटील, अँड योगेश पाटील, मुनोत जैन, अनिल वाघ,राजू पाटील,डॉ.अमोल जाधव, डॉ प्रमोद पाटील,डॉ प्रवीण माळी, डॉ रुपेश पाटील, डॉ गोरख महाजन, डॉ शरद वाणी, डॉ. प्रतीक पाटील,डॉ जीवन पाटील, डॉ तोसीफ खान, डॉ विशाल पाटील,डॉ बच्छाव, डॉ अमोल जैन, डॉ आलम देशभुख, डॉ. पवण राजपुत, डॉ सचिन पाटील, डॉ स्वप्नील पाटील, सीए अंकीता अग्रवाल, अमोल जैन, संचालन प्रा सी एन चौधरी व शिवाजी शिदे यांनी सहकार्य केले.

Protected Content