Home Agri Trends फैजपूर येथे वृक्षदिप उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

फैजपूर येथे वृक्षदिप उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

0
36
faizpur tree plantation

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथे भारतीय जनता पार्टी, दिपाली ग्रुप व राष्ट्रीय नमो सेना यांच्या तर्फे वृक्षदिप उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

वन विभाग आयोजित वन महोत्सव ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानास हातभार लावावा म्हणून हे वृक्षारोपण करण्यात आले. याच्या अंतर्गत शिवाररस्त्यांच्या कडेला तसेच विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी दिपाली ग्रुपच्या अध्यक्षा व राष्ट्रीय नमो सेना महिला मोर्चा अध्यक्षा दिपाली चौधरी व देवेंद्र झोपे यांनी वटवृक्ष व औदुंबर रोपांची लागवड करुन वृक्षारोपण मोहीमेची सुरुवात केली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष संजय रल, पत्रकार संजय सराफ, राष्ट्रीय नमो सेना जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, प्रगतिशील शेतकरी अनिल छगन बोरोले, तुषार चौधरी आदी उपस्थित होते. वृक्षदिप उपक्रमांतर्गत ३० सप्टेंबर पर्यंत फैजपूर आणि परिसरात एक हजार झाडे लावण्याचा संकल्प दिपाली चौधरी यांनी याप्रसंगी नमूद केला.


Protected Content

Play sound