भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ ते यावल रोडवर अपघात झालेल्या स्कूटीस्वार कुटुंबाची डॉ. केतकीताई पाटील यांनी रस्त्यावरच सुश्रुषा केली.
गोदावरी फाउंडेशनच्या सदस्य तथा रावेर लोकसभेच्या युवा नेत्या डॉ.केतकीताई पाटील या दौर्यावर असतांना त्यांना भुसावळ ते यावल रस्त्यावर एका स्कूटीला अपघात झाल्याचे दिसून आले. यात पुरूष, महिला आणि बालक यांना मार लागला होता. अपघातग्रस्तांना पाहून डॉ. केतकीताई पाटील यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी भुसावळ येथे पाठविले.
डॉ.केतकीताई पाटील यांनी केलेल्या तातडीच्या मदतीबद्दल अपघातग्रस्त कुटुंबाने त्यांचे आभार मानले आहेत.