Home क्राईम गोळीबारात जखमी तरूणावर उपचार; प्रकृती स्थिर

गोळीबारात जखमी तरूणावर उपचार; प्रकृती स्थिर

0
22

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील घाट रोड परिसरात सायंकाळी झालेल्या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या तरूणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव येथील घाट रोड परिसरातील हुडको भागात मदिना मशिदीजवळ सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास अज्ञात दोन व्यक्तींनी यामाहा कंपनीच्या गाडीवर येऊन अचानक गोळीबार केला. यात तीन गोळ्या झाडल्या गेल्या असून एक गोळी हवेत फायर झाली तर दुसरी जमिनीवर फायर झाले आहे. यात एक गोळी शेख जुगर शेख सलीम (बंबैय्या) या तरुणास मांडीवर लागल्याचे वृत्त असून सदर जखमी करून शहरातील देवरे हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. या तरूणाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन पाहणी करून संशयितांचा शोध सुरू केला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Protected Content

Play sound