उंबरखेड शिवारातून अवैध वाळूची वाहतूक; मेहुणबारे पोलीसात गुन्हा दाखल

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  तालुक्यातील उंबरखेड शिवारातून विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मेहुणबारे पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी दोन जणांवर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड शिवारात गिरणा नदीपात्रातून मध्यरात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती गावातील उंबरखेड ग्रामपंचायत सदस्य रोशन राजेंद्र पाटील यांना मंगळवार १ मार्च रोजी यांना दिसून आले. त्यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला विरोध केला. तर ट्रॅक्टर चालक अनिल भारत गायकवाड आणि रविंद्र शिवाजी ठाकरे दोन्ही रा. उंबरेखेड ता. चाळीसगाव यांनी ग्रामपंचायत सदस्य रोश पाटील यांना शिवीगाळ केली. तर ट्रालीतील वाळू जागेवर टाकून पसार ट्रॅक्टर घेवून पळ काढला. दरम्यान अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती  मेहुणबारे पोलीस ठाण्यात माहिती दिली. याबाबत पोलीस नाईक अशोक राठोड यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात अनिल गायकवाड आणि रविंद्र ठाकरे रा. उंबरखेड ता. चाळीसगाव दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अन्वर तडवी करीत आहे.

Protected Content