सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) पुणे६ यांच्या परिपत्रकानुसार केंद्र शासनाच्या आदेशान्वये “हत्तीरोग दूरीकरण मोहीम 2027” अंतर्गत मार्गदर्शक सूचनानुसार पोस्ट व्हॅलिडेशन सर्व्हेलन्स करिता वाघोदा खुर्द, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. या गावाची निवड करण्यात आली. मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ तुषार देशमुख यांच्या आदेशाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल भंगाळे , सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी एल जी भालेराव साहेब व तालुका आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 16/12/2024 व दिनांक 17/12/2024 रोजी रात्री दहा ते बारा वाजेच्या दरम्यान वाघोदा खुर्द गावात प्राथमिक आरोग्य केंद्र थोरगव्हाण,तालुका रावेर, जिल्हा जळगाव.येथील तीन आरोग्य पथकाद्वारे रात्र रक्त नमुना संकलन पडताळणी करण्यात आली.
वाघोदा खुर्द गावातील एकूण घर संख्या 447 व लोकसंख्या 1720 आहे त्यापैकी दिनांक 16.12.2024 रोजी 125 घरांमधून 150 व्यक्तींचे रात्र रक्त नमुने घेण्यात आले व प्रयोगशाळेत तपासणी केली असता एकही रक्तनमुना दूषित आढळून आलेला नाही. व दुसऱ्या दिवशी दिनांक 17 12 2024 रोजी 105 घरांमधून 150 व्यक्तींचे रात्र रक्तनमुने घेण्यात आले आहेत व ते प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविण्यात आलेले आहेत.
एकंदरीत गावाचे लोकसंख्या पाहता गावात तीन भाग करण्यात आले व तीन पथकांद्वारे रात्री दहा वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत रात्र रक्त नमुने संकलन करण्यात आले. त्याकरिता प्रत्येक पथकामध्ये आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक, सेविका, आशा ह्यांनी घरोघरी जाऊन भेटी देऊन मोठ्या प्रमाणात कीटकजन्य आजार व इतर आजारांबाबत जनजागृती केली. सोबत मा सरपंच, पोलीस पाटील, सदस्य. सामाजिक कार्यकर्ते व इतर ग्रामस्थ मंडळी यांनी प्रत्यक्षात पथकासोबत फिरून उस्फूर्तपणे सहकार्य केले .
ह्या कार्यक्रमात ग्रामपंचायतचे प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच दिपाली जितेंद्र चौधरी, उपसरपंच सत्तार पटेल, ग्रा . पं सदस्य संदीप कोलते, जितेंद्र चौधरी, पिरन कुलकर्णी, रुपाली कोलते, पूजा कोलते, वंदना कोलते, दमयंती शिंदे, फातमा तडवी, ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत पाटील , पोलीस पाटील राजेश कोलते , सामाजिक कार्यकर्ते श्री राजूभाऊ पटेल, ग्रामपंचायत कर्मचारी रवींद्र कोळी व वैभव चौधरी. व इतर सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ या सर्वांचे अनमोल व उत्स्फुर्तपणे सहकार्य लाभले.