भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील डीआरएम ऑफिस जवळ एका तृतीयपंथ्याला शिवीगाळ करत मारहाण करून लोखंडी ब्लेडने डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवार २० मार्च रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. या संदर्भात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, तानिया किन्नर (वय-२९, रा. फुलगाव ता. भुसावळ) ही तृतीयपंथी गुरुवार २० मार्च रोजी दुपारी १ वाजता भुसावळ शहरातील डीआरएम ऑफिस जवळून जात असताना रस्त्यावर संशयित आरोपी रितिक भगवान निंदाने (रा. वाल्मिक नगर भुसावळ) आणि त्याच्यासोबत अनोळखी दोन जण किन्नर तानिया समोर आले. त्यावेळी माझ्याशी का बोलत नाही या किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच लोखंडी ब्लेडने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली आहे. दरम्यान जखमी झालेल्या तानिया किन्नरला भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या संदर्भात सायंकाळी ७ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी रितिक भगवान निंदाने रा.वाल्मिक नगर भुसावळ आणि सोबत अनोळखी दोन व्यक्ती या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद करीत आहे.