Home Cities जळगाव जळगावातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगावातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या


images 1
 

जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सेवेचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांची बदल्या झाल्या होत्या. त्यानुसार अनेक अधिकारी जिल्ह्याबाहेर गेले होते. तर इतर जिल्ह्यातील इतर अधिकारी जळगावात आले होते. त्यानुसार आज सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले.

जळगाव जिल्ह्यातील काही निरीक्षकांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर झाल्या होत्या. त्यानुसार इतर जिल्ह्यातून देखील नवीन पोलीस अधिकारी जळगावात आले होते. त्यानुसार आज मानव संसाधन विभागाचे विलास सोनवणे यांची जिल्हापेठ पोलीस ठाणे, नंदुरबारहून आलेले दीपक बुधवंत यांची रामानंदनगर पोलीस स्थानक, नाशिक ग्रामीण येथून आलेले रविकांत सोनवणे यांची जळगाव शहर पोलीस स्थानक, अंबादास मोरे यांची धरणगाव, सुनील खरे यांची बोदवड, लिलाधर कानडे यांची पारोळा, विजय ठाकुरवाड यांची चाळीसगाव शहर, नाशिक शहर येथून आलेले विनायक लोकरे यांची चोपडा शहर पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे. तसेच नाशिक येथून आलेले सहाय्यक निरीक्षक पवन देसले यांची पाळधी तर पाळधी येथील उपनिरीक्षक जगदीश मोरे यांची जळगाव शहर पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound