जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदेंची नगरला बदली; मुरलीधर कासार रूजू

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पोलीस स्टेशनचे ‘सिंघम’ म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची विनंती बदली म्हणून अहमदनगरला बदली झाली असून त्यांचा जागेवर जळगाव सायबरला असलेले पोलीस निरीक्षक मुरलीधर माधव कासार हे जामनेर पोलीस स्टेशनला रुजू झाले असून त्यांनी पदभार स्वीकारला.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचा जामनेर पोलीस स्टेशनला तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांनी विनंती बदली घेतली आहे. त्यांनी त्यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात अतिशय चांगलं काम केलं आहे. त्यांनी अतिक्रमणाचा विषय उत्तम प्रकारे हाताळून गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना आळा घातला. त्याचबरोबर अनेक गुन्हे त्यांनी उघडकिस आणले आहे त्यांची जामनेर तालुक्यात सिंघम म्हणून ओळख झाली होती.अशा प्रकारे कामकाजाचा ठसा त्यांनी उमटवला असून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख नेहमी आठवणीत राहणारी आहे.

किरण शिंदे यांना जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने निरोप देताना अनेक पोलीस कर्मचार्‍यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी जामनेर पोलीस स्टेशनच्या पदभार सोडला असून नवीन आलेले मुरलीधर कासार यांनी पदभार स्वीकारला आहे.

Protected Content