रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तीन दिवसांपूर्वी तीन अवैध वाळूचे ट्रॅक्टर जप्त केल्यानंतर आज सकाळी नंदुरबार येथून तापी नदीतून चोरटी वाळूची वाहतूक करणारा ट्रॉला रावेरात खाली होत असतांना महसूल विभागाने जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, रावेरसह निंभोरासिम व पाल परिसरात मोठ्या प्रमाणात नदी पात्रातुन वाळूचे उत्खनन होत असतांना आज रावेर शहरात महसूल पथकाने मोठी कारवाई केली आहे. नंदुरबार येथून वाळु घेऊन आलेला. ( MH 43 Y 8087) नंबरचा ट्राला वाळु भरून रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालयात परिसरात खाली होत असतांना गुप्त माहितीच्या आधारावरुन महसूल पथक घटनास्थळी पोहचले व संबधित ट्राला चालकाला वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांच्याकडे असलेला परवाना व ऑनलाइन ईटीपी बघितला असता त्याची मुदत संपली होती. एका ईटीपीवर दोन ते तीन फेरा ट्राला करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संबधित महसूल पथकाने ट्राला रावेर तहसिल कार्यालयात जप्त करून पंचनामा केला आहे.
या महसूल पथकाने केली कारवाई
रावेर शहरात वाळू वाहतुकीच्या संशया वरुन जप्त केलाली कारवाई मंडळ अधिकारी जे डी भंगाळे (खिरोदा प्र यावल, विठोबा पाटील(खानापुर), जि.एन. शेलकर (ऐनपुर), तलाठी निलेश चौधरी (सावखेडा), शैलेश झोटे (के-हाळा), रवि शिंगने(अटवाडा), गुणवंत बारेला(पाल), भगत अप्पा (खानापुर), रोशनी शिंदे (खिरोदा प्र यावल), दादाराव कांबळे (रावेर) या पथकाने केली आहे.