रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील भोकरनदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसीलदार बंडू कापसे यांनी दुचाकीवर जावून केऱ्हाळा गावानजीक पकडले.
रावेरला लागून वाहणाऱ्या भोकरनदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी तहसीलदार बंडू कापसे यांच्याकडे येत होत्या. तहसीलदार बंडू कापसे यांनी दैनंदिन शासकीय कामकाजाच्या व्यस्त शेड्यूलमध्ये देखील वेळ काढून कोतवाल गणेश चौधरी यांना सोबत घेऊन फिल्डवर मोटरसायकलने कारवाईसाठी जाऊन अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर केऱ्हाळा गावानजिक पकडले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील स्थानिक तलाठ्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे अवैध वाळूवर कारवाई होत नसल्याचे येथील स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.