धरणगाव प्रतिनिधी । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धरणगाव शहरासह तालुक्यातील गुलाबराव देवकर आणि उन्मेष पाटील यांच्यामध्ये अतिशय चुरशीची लढत रंगणार असल्याचा सूर आज लाईव्ह ट्रेंडस्तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रातून दिसून आला.
लोकसभेमुळे राजकीय वातावरण तापू लागले असतांना आता धरणगावातून नेमका कुणाला कौल मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे. या अनुषंगाने लाईव्ह ट्रेंडस् न्यूजतर्फे विविध पक्षाच्या मान्यवरांना बोलते करण्यात येत आहे. आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या लाईव्ह टॉक-शोमध्ये काँग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी. पाटील, प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, भाजप तालुकाध्यक्ष संजय महाजन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी.के. पाटील, माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, भाजपचे गटनेते कैलास माळी, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील, आबा वाघ, मोहन पाटील, विजय शुक्ल, रतीलाल नाना पाटील, भूषण पाटील, लक्ष्मण पाटील, गुलाब मराठे, अरविंद देवरे, आनंद पाटील, रवींद महाजन, सम्राट परिहार आदी सर्वपक्षीय मान्यवर सहभागी झाले होते.
या लाईव्ह टॉक-शो मध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर अतिशय सांगोपांग चर्चा झाली. यात स्थानिक, तालुका, जिल्हा, राज्य ते थेट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुद्यांचा समावेश होता. यात गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्री आणि जळगाव ग्रामीणचे आमदार असतांना केलेल्या कामाचा उल्लेख राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी केला. याला मोदी सरकारची जनहिताच्या विरूध्द असणार्या धोरणांची जोड देण्यात आली. तर भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी केंद्र व राज्य सरकारनी केलेली कामे, खासदार ए.टी. पाटील यांनी केलेली कामे, ना. गुलाबराव पाटील यांनी केलेली कामे आणि एकंदरीतच युतीच्या सरकारनी केलेल्या कामांचा उल्लेख करून उन्मेष पाटील यांना मताधिक्य मिळणार असल्याचा दावा केला.
पहा : धरणगावकर सर्वपक्षीय पदाधिकार्यांना लोकसभा निवडणुकीबाबत नेमके काय वाटते ते !
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/791291227905271