यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे बोराळे गावातील परिसरात मुसळधार पाऊसासह विज कोसळल्याने दोन बैलांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, अद्यापही गावात पाऊस सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, या गावातुन जाणाऱ्या नदीला १५ वर्षानंतर महापुर आला आहे. यामुळे दोघं गावांचा संपर्क तुटला असून एका ठिकाणी वीज पडल्याने दोन बैलांचा मृत्यु तर दोन मोटरसायकली पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना घडली आहे. अजून ही या गावात पाऊस सुरू असल्याचे वृत्त हाती आले आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील पश्चिम क्षेत्रातिल असलेली चुंचाळे व बोराळे या गाव परिसरात आज सायंकाळच्या सुमारास ढगफुटी झाल्याने दोघ गावांना जोडणाऱ्या नदीला सुमारे २००६नंतर अशा प्रकारचे मोठे पुर आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ढगफुटी व विज कोसळल्याने बोराळे गावातील शेतकरी सुरेश धनगर यांच्या घरासमोर बांधलेल्या बैलांच्या अंगावर विज कोसळयाने सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन बैलांचा मृत्यु झाला असुन याशिवाय यांची संजयसिंग राजपुत आणी रमेश धनगर यांच्या १ लाख ३० हजार रुपये किमंतीच्या दोन मोटरसायकली देखील पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याचे वृत्त आहे.
दरम्यान चुंचाळे बोराळे गावांच्या उत्तरेकडील असलेल्या सातपुडा पर्वताच्या जवळ असलेल्या निंबादेवी तलावाच्या परिसरात ढगफुटी झाल्याने अचानक परिसरात मुसळधार पाऊस मागील पाच तासांपासुन सुरू असल्याने अचानक गावातील नदीला मोठा पुर आल्याने दोघ गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. उद्या प्रशासकीय यंत्रणेकडुन नुकसानीचे पंचनामे झाल्यावर कितीनुकसान झाले आहे हे चित्र स्पष्ट होइल.