चोरीच्या ७ दुचाकींसह संशयिताला अटक; नशिराबाद पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी शहाबाद शेख अब्दुल रहमान वय-२४, रा. नशिराबाद ता.जळगाव याला नशिराबाद पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी २ जुलै रोजी त्याच्याकडून चोरीच्या ७ दुचाकी हस्तगत केली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, नशिराबाद गावात राहणारे प्रणव पाटील यांची ५० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना ६ जून रोजी घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात ७ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना ही दुचाकी शहाबाद शेख अब्दुल रहमान वय-२४, रा. नशिराबाद ता.जि.जळगाव याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नशिराबाद पोलिसांनी त्याला सोमवारी १ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता गावातून अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मंगळवारी २ जुलै रोजी अजून इतर चोरीच्या एकूण ७ दुचाकी काढून दिल्या. याप्रकरणी त्याच्यावर नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नशिराबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल युनुस शेख, शिवदास चौधरी, राजेंद्र ठाकरे, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रवीण लोहार, अजित तडवी, पोहेकॉ रविंद्र इंधाटे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे हे करत आहे.

Protected Content