लंडन वृत्तसंस्था । जमैकाच्या टोनी अॅन सिंग हिने येथे पार पडलेल्या ६९व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारून हा मानाचा किताब पटकावला आहे.
२३ वर्षांची टोनी-अॅन सिंग ही फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे. ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे. ती गायिका देखील आहे. ती कॅरेबीयन द्वीप समुहातील जैमैका या देशाची रहिवासी आहे. तिची आई कॅरेबीयन तर वडील ब्रॉडशा सिंग हे भारतीय वंशाचे आहेत. टोनी महिलांचा अभ्यास आणि मानसिकता याचा अभ्यास करत आहे. फावल्या वेळेत गाणं, पाककला, व्लॉगिंग करायला टोनीला आवडतं. ती क्लासिकल ऑपेराही गाते. माजी विश्वसुंदरी २०१८ वेनेसा पोन्स हिने टोनी हिला मानाचा मुकूट चढवला. दरम्यान, या स्पर्धेत भारतातर्फे सहभागी झालेली सुमन राव ही तिसर्या क्रमांकापर्यंतच मजल मारू शकली.