पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर सबगव्हाण टोल हा गेल्या ५ महिन्यांपासुन सुरू झाला आहे. यामुळे पारोळा शहरासह सभोवतालील खेडे गावांतील लहान-मोठ्या वाहनधारकांचा खिशाला कैची लागली आहे. दैनंदिन प्रवास करणारे शासकीय, खाजगी कर्मचारी, आपला उदरनिर्वाह भागवणारे व्यावसायिक यांसह या महामार्गाने पारोळा तालुक्यातील आपल्या खाजगी वाहनांनी प्रवास करणारे नागरिक खुप हैराण झाले होते.
सबगव्हाण टोल हा पारोळ्यापासुन अवघ्या १५ की.मी.चा आत आहे. अशात धुळे येथे जाण्यासाठी दैनंदिन नागरिकांना टोल अदा करावा लागत होता. या संदर्भात अनेकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोटी आश्वासने देवुन नागरिकांची दिशाभुल केली. परंतु नागरिकांना टोल हा द्यावाच लागत होता. या टोल संदर्भात दैनंदिन उद्भवणाऱ्या समस्यांची आमदार अमोल पाटील यांनी दखल घेत शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग क्र.६ व टोलधारकांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत टोल संदर्भात पारोळेकरांना दैनंदिन होत असलेल्या जाचाचा पाढाच वाचला गेला, त्यावर येत्या दोन दिवसांत मार्ग काढण्याचे आश्वासन टोलधारकांनी दिले होते. त्याच अनुषंगाने आजआमदार अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टोलधारकांसमवेत बैठक पार पडली. या बैठकीत पारोळेकरांना आपला रहिवास पुरावा आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स दाखवुन अवघ्या २० रूपयांत एका बाजुने टोल अदा करावा लागणार आहे. तसेच हा टोल अदा करतांना सिस्टीमने अगर टोलची पुर्ण रक्कम कट झाली तर ती देखील रक्कम त्या वाहनधारकास परत करण्यात येईल.
या निर्णयाने पारोळेकरांना खिशाला लागणारी कैची थांबणार असुन वाहनधारकांचा मागणीनुसार आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या मध्यस्तीने रहीवास पुरावा दाखवल्यास २० रूपयांत पारोळेकरांची वाहने सुटणार आहेत. या निर्णयानंतर आमदार अमोल पाटील यांनी टोलधारकांचा सत्कार करत आभार मानले. व उपस्थित वाहन धारकांनी आमदार अमोल पाटील यांनी दैनंदिन होणार त्रास मार्गी लावल्याबद्दल सत्कार करत आभार मानले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख अमृत चौधरी, राजुदादा परदेशी, जनरल मॅनेजर लतीफ शेख, प्रोजेक्ट मॕनेजर नरेंद्र खैरनार शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांचेसह पारोळा तालुक्यातील वाहन धारक उपस्थित होते.