धरणगाव (प्रतिनिधी) काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्याचा भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सायंकाळी निषेध सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्याचा भ्याड हल्ल्यात शाहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना आज सायंकाळी ७:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ श्रद्धांजली अर्पण करत जाहीर निषेध करण्यात येणार आहे. तरी सर्व देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन धरणगाव शिवसेना युवा सेना विद्यार्थी सेनेच्यावतीने करण्यात आलेले आहे.