जळगाव (प्रतिनिधी) शहरात आज शनिवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण परिवर्तन महोत्सवाचे उद्घाटन होत आहे.
या महोत्सवाचा शुभारंभ ‘ नली ’ या राज्यभर गाजलेल्या नाट्य प्रयोगाने एस एम आय टी महाविद्यालयाच्या प्रांगणात ६.३० वाजता होणार आहे. या नाटकाचे लेखक श्रीकांत देशमुख असून संकल्पना शंभू पाटील यांची आहे. नाटकाचे दिग्दर्शक योगेश पाटील असून हर्षल पाटील सादरकर्ते आहेत. सर्व रसिकांनी या नाटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.