आज वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र !

earth rotation

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | आज वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र आहे. आज केवळ १० तास ५७ मिनिटे सुर्याचे दर्शन घडणार आहे. रात्र सर्वात मोठी म्हणजे १३ तास ०३ मिनिटांची राहणार आहे. २२ डिसेंबर रोजी सुर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला ‘विंटर सोलस्टाईल’ असे म्हणतात.
या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते.

 

आज सकाळी ७.१२ मिनिटांनी सूर्योदय झाला असून ६.५ मिनिटांनी सूर्यास्त होणार आहे. तसेच आजपासून उत्तरायण प्रारंभ होत आहे. वर्षभर दिवस आणि रात्रीचा कालावधी हा कमी-अधिक होत असल्याचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशांनी कललेला असल्याने हे घडते. याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायणचा अनुभवसुद्धा येत असतो.

कोणत्याही वस्तुच्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकते. पृथ्वीवरील ऋतुसुद्धा अक्षाच्या कलण्याच्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैश्विक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनीक छेंदन बिंदू असतात. यापैकी एका बिंदूवर २२ मार्च रोजी तर दुसऱ्यावर २२ सप्टेंबर रोजी सूर्य असतो, या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो. २१ जून हा ग्रेगेरियन वर्षातील १७२ वा दिवस आणि लीप वर्षात १७३ वा दिवस असून हा विषुवृत्ताच्या उत्तरीय भागात सर्वात मोठा दिवस असतो.

२१ जून या दिवसाचे कालमान जवळपास १४ तासांचे तर रात्रीचे कालमान १० तासांच्या जवळपास असते. खगोलीय घटनेप्रमाणे २१ जूनला पृथ्वी आपला गोलार्थ बदलवत असून या दिवसापासून सूर्याचे काल्पनिक दक्षिणायन होण्याला सुरूवात होते. हा क्रम २१ डिसेंबरपर्यंत चालते. तोच २२ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस असून त्यानंतर सूर्याची उत्तरायण होण्याची प्रक्रिया सुरू होऊन ती २१ जूनपर्यंत चालत असते. पृथ्वी २४ तासात एक वेळा स्वत: फिरत असून २४ तासात दिवस-रात्र घडत असतात. त्याचप्रमाणे स्वत: भोवती फिरत असताना पृथ्वी ३६५ दिवसांत सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करीत असते. म्हणून ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे ३६५ दिवसांचे एक वर्ष मानले जाते.

२१ जूननंतर वर्षातील १९३ दिवस उरले असतात. २१ जूनपासून सूर्याचे दक्षिणायन होण्याचे चक्र सुरू होत असून दिवस लहान आणि रात्र मोठी होण्याला सुरूवात होते. हा क्रम चालत असताना २३ सप्टेंबरला रात्र आणि दिवस दोन्ही समान म्हणजे १२-१२ तासांचे असतात. तसेच २२ डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायण क्रम सुरू होते आणि २३ मार्चला दिवस आणि रात्र समान १२-१२ तासांचे असतात. त्यानंतर दिवस मोठा होण्याचा क्रम सुरू राहत असून मार्चनंतर उन्हाळा व तापमान वाढत असतो. अखेरीस २१ जूनला पुन्हा सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र होतात.

पृथ्वीवर काल्पनिक रेखांचे जाळे आहेत. त्यातील आडव्या रेषांना अंक्षांश आणि उभ्या रेषांना रेखांश म्हणतात. मधोमध शून्य अंशांवरून गेलेली अंक्षाश रेखा विषुवृत्त असून उत्तरेकडे २३(१/२) अंशांवर कर्कवृत्त आणि ६६(१/२) वर आर्कटीक वृत्त तर दक्षिणेकडेही एवढ्याच अंतरावर मकरवृत्त व अंटार्टिक वृत्त आहेत. उत्तरेकडील कर्कवृत्त हे भारताच्या मधोमध गेले असून २१ जूनला सूर्याची स्थिती कर्करेषेच्या सरळ रेषेत असून यावेळी प्रचंड तापमान वाढलेले असते.

भारतात वेळेचे निर्धारण पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक रेखांश रेखांपैकी ८२(१/२) अंशांवरील रेखांश रेखा ही वाराणसी या शहराजवळून गेलेली आहे. भारताचे रोजच्या वेळा निर्धारण या ८२(१/२) वरील रेखांश रेषेवर होत असते. हा वेळ संपूर्ण भारतात चालतो. यानुसारच घड्याळ्यातील वेळ निश्चित केली जाते.
आजच्या दिवसाचा सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्रकिनारी जगभरातील लोक गर्दी करतात.

Protected Content