आज पुन्हा अजितदादा शरद पवारांच्या भेटीला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे बंडखोर मदार शरद पवार यांच्या भेटीला आले.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार आमदारांना घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आले होते. अजित पवार यांच्यासोबत एकूण ३० आमदार आतसेच काही मंत्रीही होते. काल अकस्मात भेट घेतल्यानंतर आज पुन्हा अजितदादांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

 

अजित पवार यांच्यासह ९ जणांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार गटाने या आमदारांना अपात्र करण्याची विनंती करणारं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे. त्यामुळे या मंत्र्यांना अपात्र करू नये. काही तरी तोडगा काढावा ही मागणी करण्यासाठी हे सर्व आमदार शरद पवार यांच्याकडे आले असल्याचं मानले जात आहे.

 

आज ३० आमदारांना घेऊन अजित पवार आले आहेत. या सर्वच्या सर्व ३० आमदारांची भूमिका समजून घ्या, अशी विनंती अजित पवार यांनी या आमदारांना केली आहे. तसेच सर्व आमदार हे शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले आहेत, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

 

दरम्यान, अजित पवार हे भेट घेऊन बाहेर आल्यानंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये काम करत असलेले सर्व आमदार आज भेटण्यासाठी आलो होतो. शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आणि चर्चा केली. फक्त मंत्र्यांनीच नव्हे तर बाकीच्या आमदारांनाही आशीर्वाद मिळावेत, यासाठी आज पुन्हा आल्याचं पटेल यांनी नमूद केलं.

Protected Content