गुलाबभाऊंकडे आली अतिरिक्त जबाबदारी : या खात्याचा कार्यभार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर एका खात्याची अतिरिक्त जबाबदारी टाकली आहे.

 

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे अधिवेशनाच्या कालखंडात सामान्य प्रशासन खात्याची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे या खात्याशी संबंधीत सर्व प्रश्‍नांना गुलाबभाऊंना उत्तर द्यावे लागणार आहे.

 

पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकार्‍यांकडे अतिरिक्त कार्यभार दिला आहे. यात गुलाबराव पाटील यांना सामन्य प्रशासन तर उदय सामंत यांच्याकडे नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, शंभूराज देसाईंकडे सामाजिक न्याय आणि दिव्यांग, दादा भुसे यांच्याकडे परिवहन, अब्दुल सत्तारांकडे खनिकर्म आणि दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण खाते देण्यात आले आहे.

 

 

आज पहिल्या दिवशी अपेक्षेनुसार दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले असले तरी उद्यापासून मोठी खडाजंगी होण्याची शक्यता आहे. अजीत पवार आणि त्यांचे सहकारी सोबत आल्याने सत्ताधारी पक्षाची बाजू मजबूत झालेली आहे.

Protected Content