जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात नव्यान ६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात सध्या १६ कोरोना रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या १६ कोरोना बाधित रूग्ण उपचार घेत आहे. आज नव्याने ६ कोराना रूग्ण आढळून आले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात कोरोना जवळपास आटोक्यात आला होता. आता कोरोनाच्या नव्या लाटेत रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
आज भुसावळ तालुक्यातून – ३, चोपडा तालुका – १, यावल – २ असे एकूण ६ कोराना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ५१ हजार ५७५ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९६८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.