बुलडाणा प्रतिनिधी । प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 775 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 757 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 9 व रॅपीड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 356 तर रॅपिड टेस्टमधील 401 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 757 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : नांदुरा शहर : 3, खामगांव शहर : 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 2, जळगांव जामोद तालुका : बोराळा 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : बेराळा 1, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : मंडपगांव 1, मेहकर तालुका : चिंचोली 1, बुलडाणा शहर : 1, बुलडाणा तालुका : देऊळघाट 1, लोणार तालुका : टिटवी 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 18 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 27 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 602646 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86386 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86386 आहे.
आज रोजी 1360 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 602646 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87134 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86386 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 83 सक्रीय रूग्ण असून उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 665 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.