Home धर्म-समाज लवकरच आदिवासी समाजाच्या समस्या सोडवू -आ. संजय सावकारे

लवकरच आदिवासी समाजाच्या समस्या सोडवू -आ. संजय सावकारे

0
119

वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगावातील सिद्धेश्वर नगरात आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत आदिवासी दिन साजरा करण्यात आला असून लवकरच आदिवासी समाजाच्या समस्या सोडवू, असे प्रतिपादन आ. सावकारे यांनी यावेळी केले.

शहरातील सिद्धेश्वर नगर येथे आदिवासी समाजाची जवळपास शंभर कुटुंबे राहतात या ठिकाणी आज जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते एकलव्य यांच्या प्रतीमेश पुष्पहार अर्पण करण्यात आला. आमदार संजय सावकारे यांनी या ठिकाणी असणाऱ्या आदिवासी समाजातील कुटुंबाच्या समस्या जाणून घेतल्या व या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन भिल समाजातील नागरिकांना आमदार संजय सावकारे यांनी दिले आहे.

 

 


Protected Content

Play sound