चोपडा, प्रतिनिधी | मेळावे , मीटिंग, गर्दि गोळा करायची असेल तेव्हा आम्ही आणि टिकीट दुसऱ्याला असा प्रश्न पंचायत समितीचे सभापती डी. पी.साळुंखे यांनी उपस्थित केला. ते राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार होते. परंतु, त्यांचे काही दिवसांपूर्वीच तिकीट कापले गेले आणि जगदीश वळवी यांना दिले गेल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत आज आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीचे कार्यक्रम ,मेळावे, सभा, मीटिंग, असली की मला सांगितले जात होते, की सर आपण भावी उमेदवार आहेत. तर मग हा खर्च आणि जितके जास्त माणसं आली तेव्हढा फायदा होईल असे सांगून पैसा, वेळ, गर्दी हे तिघही आमच्या कडून घेतले जात होते. आत्ताचे उमेदवार तर त्यावेळी भूमिगत होते. मी राष्ट्रवादीचे नेते अरुणभाई गुजराथी यांच्या सोबत तालुक्यातील प्रत्येक गावात, सुख दुःखात, कार्यक्रमांना भेटी दिल्या आहेत. जगदीश वळवी यांनी तालुक्यातील एकही कार्यक्रमाला भेट दिली आहे का ? अरुणभाई गुजराथी यांच्यासोबत कोणत्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे का? राष्ट्रवादीचा कोणी पदाधिकारी, नेता, चोपड्यात आले तेव्हा तरी भाईंच्या घरी आले का ? राष्ट्रवादीने जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी आंदोलन केली तेव्हा तरी हे कुठे होते ? जो उमेदवार पाच वर्ष भूमिगत असतो त्या उमेदवाराला आपण घरी जाऊन तिकीट देता ? कारण जगदीश वळवी यांचा अजूनही राष्ट्रवादीत प्रवेशाच्या कार्यक्रम झाला नाही. मग स्थानिक उमेदवाराने काय करावे ? असा भावनिक सवाल त्यांनी केला. मी पंचायत समिती सभापती, माझी धर्मपत्नी दोन वेळा जिल्हा परिषद सदस्या, मी विधानसभा निवडणुक लढलो त्यावेळी मला ५६ हजार मते पडली होती. इतकं असून देखील तिकीट स्थानिक नेत्यांनी कापल्यामुळे मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पत्रकारांनी विचारले असता की आपणावर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई केली तर त्यावर ते म्हणाले की मीच राष्ट्रवादी सोडली आहे तर ते काय शिस्तभंगाची कारवाई करतील ? माझ्या सोबत मित्र म्हणून राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, लोक सोबत आहेत आता जनताच धडा शिकवेल आणि राहिला प्रश्न जिल्हा परिषद, पंचायत समितीचा तर ती निवडणूक मी स्वतः च्या हिम्मतीवर लढत असतो. पैश्यासाठी झोपलेल्याना जाग करून निवडणूक लढत आहेत तरी मतदार यांना जागा दाखवून देईल असे त्यांनी सांगितले