मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे हरताळा येथे आज गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले आहे.
दरम्यान, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे हरताळा या गावी गणेश मडंळाचे पदाधिकारी यांची बैठक धेतली त्यांना गणेश उत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन गणेश उत्सव आगमन व विसर्जन वेळी मिरवणुक काढु नये बाबत तसेच कोरोना अनुषगांने महाराष्ट्र शासनाकडील प्राप्त सूचना समजून सांगितले आहेत. सार्वजनीक गणेश मुर्ती 4 फुट व घरगुती गणेश मुर्ती 2 फुट पेक्षा मोठी नसावी तसेच ऑनलाईन परवानगी फार्म भरू सोबत हमीपत्र जोडणे बाबत सांगीतले आहे. सदर बैठकीस 30 ते 40 पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक हजर होते.