सीमेवर लवकरच अतिरिक्त ४०० बंकर बांधणार

bunkers

श्रीनगर (वृत्तसंस्था)। पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात अतिरिक्त बंकर उभारण्यास परवानगी दिली आहे. या दोन्ही जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात येत आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २०० बंकर अतिरिक्त बांधण्यात येणार आहेत. यामुळे पाकिस्तानकडून ज्यावेळी गोळीबार करण्यात येईल, त्यावेळी येथील स्थानिक नागरिकांना त्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या बंकरचा मोठा फायदा होणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या उपायुक्तांकडे या बंकर उभारणीसाठी लागणारा निधी लवकरच सुपूर्द करण्यात येणार आहे. हे बंकर लवकरात लवकर बांधण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच, येत्या महिनाभरात दोन्ही जिल्ह्यातील ४०० बंकर बांधून तयार होतील, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Add Comment

Protected Content