जळगाव प्रतिनिधी । वडीलोपार्जित शेतीची खातेफोड करून पाटबंधारे उपविभागातर्फे लाभक्षेत्र दाखला देण्यासाठी चारशे रूपयांची मागणी करणाऱ्या कालवा निरीक्षकाला एसीबीने रंगेहात पकडले असून त्याच्या विरोधात चोपडा शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे चोपडा तालुक्यातील रहिवाशी असून त्यांच्या व त्यांचे भाऊबंदकीच्या नावे असलेली वडीलोपार्जीत शेती ही खातेफोड करण्यासाठी त्यांना पाटबंधारे उपविभाग चोपडा कार्यालयातुन लाभक्षेत्र दाखला देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे येथील पाटबंधारे उपविभागाचे कालवा निरीक्षक संशयित आरोपी विजय गिरधर पाटील, (वय-57) रा. हतनूर कॉलनी याने चारशे रूपयाची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी एसीबीला तक्रार दिली होती. तक्रारची पाडताळीसाठी आज सापळा रचन कालवा निरीक्षक विजय पाटील यांचा 400 रूपये घेतांना रंगेहात पकडले.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पो.ना. मनोज जोशी, पो.कॉ. प्रशांत ठाकुर, पो.कॉ. प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांनी कारवाई केली.