मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एमपीएससी परीक्षेतून कृषी विभागाच्या वगळलेल्या परीक्षांचा अखेर पुन्हा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सुरु असलेल्या उमेदवारांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. त्यामुळे आता कृषी विभागाच्या २५८ जागांसाठी एमपीएससीची परीक्षा घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र कृषी सेवा २०२४ परीक्षेतील २५८ जागांपैकी कृषी उपसंचालकाची ४८ पदे, तालुका कृषी अधिका-याची ५३ पदे, कृषी अधिका-याची १५७ पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी एमपीएससीने आज नव्याने प्रसिद्ध केलेली जाहिरात तपासावी. जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४- महाराष्ट्र कृषि सेवेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. यासाठी एमपीएससी करण्या-या लाखो विध्यार्थ्यांनी तीन दिवस रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनाची दाखल घेऊन कृषी विभागाच्या जागांचा राज्य सेवेच्या होणा-या परीक्षेत समावेश करण्यात आला आहे.