बटमालू परिसरात चकमक : तीन दहशतवादी ठार

शेअर करा !

श्रीनगर वृत्तसंस्था । श्रीनगर नजीकच्या बटमालू भागात आज पहाटे झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले असून अद्यापही ही चकमक सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेने दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न अयशस्वी होत आहेत. तर, समोरा समोर झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांना अनेकदा दणके देण्यात आल्याने त्यांचे कंबरडे मोडल्याचे आधीच दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर रीनगरमध्ये सुरक्षा दले आणि अतिरेक्यांच्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार श्रीनगरमधील बाटमालू भागात चकमकी सुरू आहेत. पोलिस आणि सीआरपीएफचे जवान आघाडीवर असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून ही चकमकी सुरू आहे. परिसरात सुरक्षा दलांची हालचाल वाढविण्यात आली आहे. तर, ही चकमक सुरू असतांनाच जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने आज पहाटे सहाच्या सुमारास पुंछ जिल्ह्यातील बालाकोट आणि मेंढर सेक्टरमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे.

सीआरपीएफ आणि एसओजीचे जवान दहशतवाद्यांशी लढत आहेत. यात तीन अतिरेकी ठार झाल्याची माहिती आहे. तथापि, या चकमकीत सीआरपीएफ अधिकार्‍यासह एक जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली असून ही चकमक अद्यापही सुरू आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!