जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधपणे वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूल पथकाने जप्त केले आहे. ही कारवाई गुरुवारी २० मार्च रोजी सकाळी १० वाजता केली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावालगत असलेल्या गिरणानदी पात्रातून बेसुमार अवैधपणे ट्रॅक्टर द्वारे मोठ्या प्रमाणावर वाढू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार शिरसोली येथील ग्राम महसूल अधिकारी मयूर महाले यांच्यासह पथकाने गुरूवार २० मार्च रोजी सकाळी १० वाजता गिरणा नदीपात्रात कारवाईसाठी आले. त्यावेळी वाळू माफिया महसूल पथकाला पाहून प्रसाद झाले दरम्यान महसूल पथकाने घटनांसाठी तीन ट्रॅक्टर उभी असलेले जप्त केले आहे याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी मयूर महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी 20 मार्च रोजी दुपारी तीन वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.