


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामलक्ष्मण नगर, गाडगेबाबा चौक येथील पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त रामलक्ष्मण नगर परिसरातील रहिवाशांनी २० मार्च ते २६ मार्चपर्यंत संगीतमय श्रीमद शिव भागवत कथेचे आयोजन केले आहे. दररोज संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत ही कथा चालणार आहे.

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. गजानन महाराज धानोरेकर हे या कथेचे निरूपण करत आहेत. वर्धापन दिनाचे औचित्य साधून रामलक्ष्मण नगरातील नागरिकांनी सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांची मालिकाच सुरू केली आहे.
दररोज सकाळी काकडा आरती, दोन्ही वेळेस हरिपाठ आणि संध्याकाळी श्रीमद भागवत कथा होत आहे. २७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर १० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रामलक्ष्मण नगर परिसरातील सर्व रहिवाशांनी केले आहे.


