एरंडोल/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्रावण सोमवार निमित्त जिल्ह्यातील महादेव मंदीरात विविध कार्यक्रम साजरे होत असतांना जळगाव जिल्ह्यात दुदैवी घटना सोमवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असून एका कुटुंबातील तीन नदीत बुडाल्याची समोर आले आहे. यातील दोन जणांचे मृतदेह काढण्यात आला असून तिसऱ्याचा शोध घेणे सुरू आहे. घटनास्थळी जळगाव तालुका पोलीस प्रशासन आणि धुळे येथील एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.
सागर अनिल शिंपी, अक्षय शिंपी आणि पियुष रवि शिंपी तिन्ही रा. एरंडोल अशी बुडालेल्या तीनही मुलांची नावे आहेत. हे तीनही मुलं एकाच कुटुंबातील असल्याची माहिती ही समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रावण सोमवार निमित्त जिल्ह्यातील महादेव मंदीरात विविध कार्यक्रम साजरे होत आहे. अनेक भाविक भक्त कावड यात्रेचे आयोजन करून महादेव मंदीरावर दर्शनासाठी जात आहे. या अनुषंगाने एरंडोल शहरातील भगवा चौकातील काही तरूण हे सोमवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजता वाहनातून जळगाव तालुक्यातील गिरणा, तापी आणि अंजनी नदीचा एकत्रित त्रिवेणी संगमावरील रामेश्वर महादेव मंदीरावर दर्शनासाठी गेले. दुपारी साडेतीन वाजता पोहण्यासाठी गेलेले पियुष रवि शिंपी, सागर अनिल शिंपी आणि अक्षय शिंपी हे तिघे पाण्यात बुडाल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. बुडालेल्या तिघांपैकी दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासन आणि आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पट्टीचे पोहणाऱ्या तरूणांकडून बुडालेल्याचा शोध घेणे सुरू असल्याचे माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीत उपविभागीय अधिकारी अप्पासो पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेहांचा शोध सुरूच आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने पोलीस सूत्रांशी संपर्क केला असता त्यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे.
क्षेत्र रामेश्वर येथे एंरंडोल शहरातून कावड यात्रेच्या निमित्त्ताने काही तरूण गेले होते. येथील तिवेणी संगमावर काही तरूण पोहत असतांना एकाच कुटुंबातील तिन बुडाल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानुसार रामेश्वर येथे बुडालेल्या तीनही मुलांचा शोध घेण्यासाठी धुळे येथील एसडीआरएफची टीम आणि पोलीस प्रशासन टिम घटनास्थळी रवाना करण्यात आली असून मुलांचा शोध सुरू आहे. अशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी बोलतांना दिली.