मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासूनजवळ असलेल्या बऱ्हाणपुर रोडवरील स्मशानभूमीजवळ तिहेरी अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य व रिक्षाचालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. बस-दुचाकी व प्रवाशी रिक्षाचा अपघात झाल्याची घटना सोमवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना मुक्ताईनगर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर येथून जळगाव जामोद कडे जाणारी बस क्रमांक (एमएच १४ बीटी १६०३) ही शहरापासून जवळ असलेल्या बऱ्हाणपुर रोडवरील स्मशानभूमीजवळून जात असतांना समोरून येणारी प्रवाशी रिक्षा (एमएपी १२ आर ११५०) ला धडक दिल्याची घटना सोमवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडली आहे. प्रवाशी रिक्षातील चालक हा जखमी झाला. दरम्यान, बस व प्रवाशी वाहतूक करणारी रिक्षाच्या मध्ये दुचाकी देखील आल्याने दुचाकीवरील दाम्पत्य दुचाकीवरून पडल्याने जखमी झाले आहे. जखमी झालेल्या तिघांना स्थानिक नागरीकांच्या मदतीने खासगी रूग्णवाहिकेतून मुक्ताईनगर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसांत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.