भुसावळ (प्रतिनिधी) शहरतील गांधीपुतळा भागात आज ( रविवार ) मांडूळ जातीचा साप विकणाऱ्या तीन जणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, पोलिसांना गोपनीय माहितीनुसार तीन जण मांडूळ जातीचा साप विकण्यासाठी येत असल्याचे कळल्यावरून पोलिसांनी आधी खात्री केली, त्यानंतर सापळा रचून मांडूळ सापासह पंकज विकास कोळी (वय२६), आकाश आत्माराम कोळी (वय२६) दोघे राहणार भुसावळ आणि गजानन अनिल सनान्से (वय२२) या तिघांना अटक केली आहे. सापाचा पंचनामा करून पोलिसांनी पुढील कारवाईसाठी तिघा संशयितांसह सापाला वनपाल भारत नत्थू पवार यांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पो.नि. बाबासाहेब ठोंबे, हे.कॉ. मोहम्मद अली सैय्यद, पो.कॉ. संजय पाटील, सुनील सैदाणे, भूषण चौधरी व जितेंद्र सोनावणे केली.