श्रीनगर, वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या तीन अतिरेक्यांना ठार केले. जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे आयजी कुमार यांनी ही माहिती दिली.
लपून बसले होते हे दहशतवादी
मंगळवारी सकाळी अनंतनागच्या (Anantnag) कोकरनागमधील वैलू गावात लष्कर-ए-तैयबाचे (Lashkar-e-Taiba) तीन दहशतवाद्यांना लपवल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसह संयुक्त कारवाई अभियान सुरु केले आणि कारवाईला सुरुवात केली. या चकमकीत सुरक्षा दलांने दहशतवाद्यांना घेरले. यावेळी दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दल आणि पोलिसांनी केलेल्या प्रत्युरादाखल गोळीबारात तिन दहशतवादी ठार केले.
#UPDATE All three terrorists killed in Anantnag encounter: IGP Kashmir Vijay Kumar #JammuAndKashmir pic.twitter.com/u6CMeD6fP0
— ANI (@ANI) May 11, 2021
गेल्या आठवड्यात तीन अतिरेक्यांचा खात्मा
यापूर्वी सुरक्षा दलांना जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये मोठे यश मिळाले होते आणि गुरुवारी (6 मे) चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तौसिफ अहमद नावाच्या दहशतवाद्याने सुरक्षा दलासमोर आत्मसमर्पण केले. मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीत ठार झालेल्या सर्व दहशतवादी अल-बदर (Al-Badar) या दहशतवादी संघटनेचे होते.