जातीवाचक शिवीगाळ करत कुटुंबातील तिघांना मारहाण; दुचाकीचेही केले नुकसान

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील खडके गावात एका महिलेसह तिची मुलगी आणि जावई यांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आणि दुचाकीवर दगड टाकून नुकसान केल्याची घटना गुरूवार ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी साडेसहा वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील खडके गावातील एका भागात ४२ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच गावात महिलेची मुलगी आणि जावई हे देखील राहतात. दरम्यान, महिलेच्या मुलीला घरकुल योजना मंजूर झालेली आहे. त्यासाठी घराचे बांधकाम करण्यावरून वाद झाला होता. गुरूवारी ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता याच कारणावरून गावात राहणारे पिंटू ब्राम्हणे, भैय्या संजय पाटील, आसाराम घनसिंग पाटील, दशरथ मश्चिद्र पाटील, जयदीप पाटील सर्व रा. खडके ता.अमळनेर यांनी महिलेसह तिची मुलगी आणि जावई यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १७ बीयू ७५४३) ला दगडांनी फोडून मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पिंटू ब्राम्हणे, भैय्या संजय पाटील, आसाराम घनसिंग पाटील, दशरथ मश्चिद्र पाटील, जयदीप पाटील सर्व रा. खडके ता.अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी आप्पसाहेब घोलप हे करीत आहे.

Protected Content