Home Cities अमळनेर सामाईक भिंतीच्या बांधकामावरून कुटुंबातील तिघांना मारहाण

सामाईक भिंतीच्या बांधकामावरून कुटुंबातील तिघांना मारहाण

0
102

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील तासखेडा गावात सामाईक भिंतीच्या बांधकामावरून एका महिलेसह तिच्या बहिणीला व आई-वडिलांना मारहाण करून दुखापत केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, यमुना उज्जैन पाटील वय-२२, रा. तासखेडा ता.अमळनेर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांच्या घराच्या सामाईक भिंतीचे बांधकाम सुरू असल्याच्या कारणावरून त्यांच्या शेजारी राहणारे दगडू चैत्राम पाटील, राकेश दगडू पाटील, सुरेखा उर्फ पूनम पाटील, कल्पना दगडू पाटील यांनी यमुना पाटील यांच्यासह तिची बहीण आणि आई-वडिलांना मारहाण करून गंभीर दुखापत केली, तसेच हातातील मोबाईलचे देखील नुकसान केले. ही घटना घडल्यानंतर शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता यमुना पाटील यांनी अमळनेर पोलिसांना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे दगडू चैत्राम पाटील, राकेश दगडू पाटील, सुरेखा उर्फ पूनम पाटील, कल्पना दगडू पाटील सर्व रा. तासखेडा ता. अमळनेर यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound