शेतात आढळले बिबट्याची तीन पिल्ले; परिसरात भीतीचे वातावरण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथून जवळच असलेल्या तालुक्यातील सावखेडासिम जवळील दोन किलोमीटर अंतरावर जंगल शिवारात उसाचे शेतात तीन बिबट्याची पिले ऊसतोड मजुरांना आढळून आल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सावखेडा सीम येथील सुनील राजाराम बडगुजर यांचे सावखेडा शिवारातील उसाचे शेतात आज सकाळी ऊसतोड मजूर ऊस तोडणी साठी गेले असता. त्यांना तीन बिबट्याची पिले आढळून आलेत त्यांना बघून बिबट्याची पिले उसाचे क्षेत्रात पळून गेले. त्या दहशतीने कासावीस होऊन ऊसतोड मजुरांनी ऊसतोड केली. खरी मात्र आज अपूर्ण सोडून ते तेथून बदली करून घेणार आहेत. मजुरांजवळ लहान मुले आहेत आणि बिबट्याची तीन पिले त्यांना आढळून आल्याने ती घाबरून गेलीत याबाबतची माहिती त्यांनी शेतमालक सुनील बडगुजर यांना कळवल्याने त्यांनी वन विभागाला याबाबतची सूचना केली आहे.

पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील बिलावे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुपारी घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत त्यांचा बंदोबस्त वनविभागाकडून करण्यात येईल असे त्यांनी सांगितले बिबट्याचे तीन पिले निघाल्याने नक्कीच या परिसरात मादी असू शकते या भीतीने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यांना दिसून आले तसेच त्यांनी मांसाहार केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आलेले आहे यांचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि मजूर करीत आहेत.

आमच्यासोबत आमची लहान लहान मुले आहेत त्यांचे संगोपन करणे आमची जबाबदारी आहे. नक्कीच मादी ही येथे असेल त्यामुळे आम्ही हा उर्वरित ऊस न तोडता येथून साहेबांना विनंती करून बदली करून घेणार आहोत. असे ऊस मजूर गोपीचंद कृष्णा जाधव आणि संजय बद्री राठोड राहणार दिए तांडा तालुका जामनेर यांनी सांगितले. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सावखेडासिम या ठिकाणी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जंगल शिवारातील शेतात मिळून आलेले तिन प्राण्यांचे पिल्लू हे बिबट्याचे नव्हे तर रानमांजरीचे पिल्लू असल्याची माहीती संपुर्ण चौकशी अंती वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे यांनी दिली.

Protected Content