रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अवैध लाकडांची तस्करी करणार्या वाहनांवर वन विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत ट्रक ट्रकसह साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबत वृत्त असे की दिनांक ६ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व,आगार रक्षक फैजपूर व वनरक्षक जानोरी हे शासकीय वाहनाने यावल ते फैजपूर गस्त करीत असता फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय जवळ पंचरास जळवू लाकूड विनापरवाना अवैधरित्या वाहतूक करणारे ट्रक क्र.एमपी-०९ केसी ५५५९ अडविले सदर वाहनात पंचरास इफेक्ट-१९:०० घन मिटर माल मिळून आला त्यांची अंदाजे किंमत -२६६००/-रुपये व वाहनाची अंदाजे किंमत -३,३०,०००/-रुपये असा एकूण ३,५६,६००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याब्यात घेण्यात आला आहे.
दरम्यान, वाहन चालक आरोपी नामे शेख अन्वर शेख कडू रा. खानापूर ता.रावेर विरुद्ध भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम ४१(२)ब,४२,५२ अन्वये तसेच महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे अधिनियम ८१,८२ अन्वये आगार फैजपूर यांनी प्रथम रिपोर्ट क्र.०२ /२०२३-२४ नोंदवून पुढील तपास चालू आहे.
सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक यावल जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक यावल प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाने वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व .अजय बावणे, आगार रक्षक फैजपूर सतीश वाघमारे, वाहन चालक विनोद पाटील यांनी संयुक्त रित्या कारवाई केली आहे.