जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील टॉवर चौकात दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीसह मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ३१ मे रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजहर बेग इसा बेग मिर्झा वय ३६ रा. सय्यद वाडा भडगाव ह.मु. उस्मानिया पार्क शिवाजी नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ३१ मे रोजी सायंकाळी ६ वाजता अजहर बेग हे त्यांच्या पत्नी व मुलगा उमर अजहर बेग मिर्झा यांच्या सोबत दुचाकीने शिवाजी नगरातून गांधी उद्यानाकडे जात असतांना टॉवर चौकात समोरून येणाऱ्या अज्ञात दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत अजहर बेग मिर्झा, त्यांची पत्नी आणि मुलगा उमर अजहर बेग मिर्झा हे दुचाकीवरून खाली पडल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैदृयकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र पाटील हे करीत आहे.