Home Uncategorized दहिवद येथे एकाच रात्री तीन घरे फोडली; ३ लाखांचा मुद्देमाल लांबविला

दहिवद येथे एकाच रात्री तीन घरे फोडली; ३ लाखांचा मुद्देमाल लांबविला


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील दहिवद गावात एकाच रात्री तीन ठिकाणी बंद घर फोडून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमोल रमेश महाजन वय-२९, रा. ठाणे, ह.मु. दहिवद ता. अमळनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ४ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दरवाजाचे कुलूप तोडून घरातून ९८ हजार रुपयांची रोकड आणि ९ हजार रुपये किमतीचे दागिने तसेच त्यांच्या शेजारी राहणारे भगवान भिवसन माळी यांच्या घरातून ५० हजार रुपयांची रोकड आणि २४ हजार रुपये किमतीचे दागिने आणि नीता संजय वाघ यांच्या घरातून ५० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असे एकूण पिकांच्या घरातून ३ लाख ५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून येण्याची घटना मंगळवार ५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता अमोल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.


Protected Content

Play sound