जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांची दरवर्षीप्रमाणे कार्तीक एकादशीला जळगावात मोठ्या उत्साहात रथोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला तब्बल १५२ वर्षाचा इतिहास आहे. या रथोत्सवाच्या वाटचालीत जळगाव नगरीत काही मानाची कुटुंब या सोहळयाच्या आयोजनात पिढयान पिढया आणि वर्षोनुर्षे योगदान देत आली आहेत. त्यापैकी एक कुटुंब म्हणजे जळगाव नगरीच्या पोलीस पाटलांचा परिवार. सध्या प्रभाकर काशिनाथ पाटील हे जळगांवचे पोलीस पाटील आहेत. आणि त्यांच्या कुटूंबाच्या चार पिढया रथोत्सवातत्याचे उत्साहाने आपली सेवा देत आहे.
विद्यमान पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांचे वडील दिवंगत काशिनाथ जयराम पाटील हे १९४० ते १९७८ दरम्यान या नगरीचे पोलीस पाटील होते. ब्रिटीशांच्या काळापासून स्वातंत्रोत्तर काळ असासलग ३७ वर्ष त्यांच्याकडे पाटीलकी होती आणि या काळात दरवर्षीं न चुकता रथोत्सवाला सेवा दिली. १९९४ मध्ये त्यांचे निधन झाले. अगदी त्या काळापर्यंत त्यांनी रथोत्सवाची सेवा कायम ठेवली होती. त्यानंतर त्यांचे जेष्ठ पुत्र प्रकाश काशिनाथ पाटील पोलीस पाटील जळगाव शहर यांनी त्यांचा हा वारसा समर्थपणे पुढे चालवला. ते १९७८ ते २००३ पर्यंत जळगांव शहराचे पोलीस पाटील होते. व २००३ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे बंधु प्रभाकर पाटील यांच्याकडे जळगांवची पाटीलकी आली. जी ते आजपर्यंत सांभाळत आहेत. वडील आणि मोठया भावाचा वारसा तेही पुढे चालवत आहेत. प्रभाकर काशिनाथ पाटील यांच्यासह त्यांचे बंधु पंडीत काशिनाथ पाटील, स्व.नारायण काशिनाथ पाटील आणि स्व.हेमराज काशिनाथपाटील यांचा सुध्दा सहभाग राहत आलेला आहे. या तीन पिढयानंतर आता त्यांच्या चौथ्या पिढीतील प्रतिनिधी सुजीत प्रकाश पाटील, ललित पंडीत पाटील, ज्ञानेश्वर नारायण पाटील, जितेंद्र प्रभाकर पाटील, अशोक प्रभाकर पाटील, शिवाजी प्रभाकर पाटील, जयेश हेमराज पाटील हे पाटील परिवार ही परंपरा जोपासत आहेत.