यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील डोंगरकठोरा या गावात होळीच्या दिवशी दांडयाच्या मिरवणुकीत डफ वाजंत्री बंद करण्याच्या वादाला घेवुन झालेल्या मारहाण प्रकरणातील संशयीत चार आरोपींपैकी तीन आरोपींना 7 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली असुन एक महीलेला जामीनीवर सोडण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त असे की, डोंगरकठोरा तालुका यावल येथे शनिवार २० मार्च रोजी होळीच्या दिवशी रात्री ७ ते १ वाजेच्या दरम्यान होळीचा डफ घरासमोर जोरात का वाजवितो ? असे जाब विचारल्या वरून झालेल्या शाब्दीक वादानंतर मारहाणी झाल्याने यात एक जण जख्मी झाले तर एका महीलेचे विनयभंग झाल्याची तक्रार यावल पोलीसात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी यावल पोलीसात संशयीत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी चार जणांना पकडण्यात आले होतो तर उर्वरित चार जण फरार झाले होते. चार पैकी यातील गिरीश राजेश पाटील, मयुर लिलाधर जंगले, आकाश निळकंठ लोखंडे यांना न्यायल्याने 7 दिवसाची न्यायलीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एका महीलेची जामीनीवर सुटका करण्यात आली आहे, या घटनेतील चार आरोपी फरार आहे. तर मारहाण गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेले भुसावळ येथील नगरसेवक नितिन बाबुराव धांडे, लिलाधर दयाराम जंगले, पवन आंनदा नाले, व महीलेचा समावेश असून हे फरार आहेत.
डोंगरकठोरा येथील हाणामारीत तिघांना कोठडी तर महिलेला जामीन
6 years ago
No Comments