अखिल भारतीय तायक्वांदो स्पर्धेत विद्यापीठाला तीन कांस्य पदक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राजस्थानच्या जे.जे.टी. विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय तायक्वांदो स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला तीन कांस्य पदक प्राप्त झालेत.

जे.जे.टी. विद्यापीठात तायक्वांदो स्पर्धा नुकतीच पार पडली. निलेश पाटील (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौ उमवि, जळगाव) याने ६० कि.ग्रँ. गटात कास्य, महिमा चौधरी (व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर) हिने ४९ कि.ग्रॅ. गटात आणि प्रेरणा जगताप (सदगुरू शिक्षण संस्थेचे शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालय, जळगाव) हिने ७३ कि.ग्रॅ. गटात कास्य पदक प्राप्त केले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
यावेळी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, प्रशिक्षक प्रा. उमेश पाटील, प्रा. किशोर पवार, अमर हटकर उपस्थित होते

Protected Content