भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मुन्सिपल पार्क येथील सेंट्रल सर्किट सिने असोसिएशन कार्यालयात अनधिकृत पणे प्रवेश करून ऑफिसमधील दोन लाकडी कॉट, लाकडी कपाट, दोन खुर्च्या आणि महत्त्वाचे कागदपत्रे असा एकूण १२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ३० मार्च रोजी दुपारी २ वाजता घडली. या संदर्भात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात ३ जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील मुन्सिपल पार्क येथे सेंट्रल सर्किट सिने असोसिएशन कार्यालय आहे. ३० मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दुकानात कार्यालयात रामराव बापू नाजी दहातोंडे वय-६०, रा.आंबेडकर नगर, भुसावळ हे बसलेले असताना सईद कालू गवळी, जाफर कालू गवळी आणि अफजल कालू गवळी तिघे रा. भुसावळ या ठिकाणी कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करून कार्यालयातील दोन लाकडी कॉट, लाकडी कपाट, दोन खुर्च्या आणि महत्त्वाचे कागदपत्रे असा एकूण १२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर रामराव दहातोंडे यांनी भुसावळ शहर पोलिसात या संदर्भात तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी ३ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल सुरवाडे करीत आहे.