जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील बोरनार येथील माध्यमिक विद्यालयातील कार्यालय फोडून कार्यालयातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कागदपत्र, दस्तऐवज, रजिस्टर, डीव्हीआर आणि रोकड असा एकूण मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरुवार ३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता समोर आले. या संदर्भात गुरुवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील बोरनार गावात सुयोग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय आहे. २ एप्रिल सायंकाळी ५ वाजता ते ३ एप्रिल सकाळी ७ वाजेच्या कालावधीमध्ये अज्ञात चोरट्यांनी शाळेचे कार्यालय फोडून कार्यालयातील गोदरेज कपाटातून कागदपत्र, दस्तऐवज, रजिस्टर, डीव्हीआर आणि रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेबाबत पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहे.