जळगाव प्रतिनिधी । उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून सहा जणांनी तरूणासह वडील व बहिणीला शिवीगाव व मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कंडारी येथे ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरून सहा जणांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, बादल लक्ष्मण परदेशी (वय-२२) रा. परदेशीवाडा कंडारी. ता. जि.जळगाव हा खासगी नोकरी करतो. आईवडील व बहिणीसोबत वास्तव्याला आहे. गावातील विलास काकडे याला ५०० रूपये उधार दिले होते. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता बादलने विलास कडे उसनवारीने घेतलेले ५०० रूपय परत मागितले. याचा राग आल्याने बादल परदेशी याला शिवीगाळ करून चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. बादलला मारहाण होत असल्याचे वडील लक्ष्मण रामदास परदेशी आणि बहिण जया हर्षा परदेशी यांनी आवरण्याचा प्रयत्न केला असता आनंदा अनिल निकम, विकास अनिल निकम, सोपान अनिल निकम, अनिल अशोक निकम, रणजित किरण परदेशी आणि अशोक निकम सर्व रा. कंडारी ता.जि.जळगाव यांनी शिवीगाळ करून लाकडी दांडूक्याने तिघांना मारहाण केली. याप्रकरणी बादल परदेशी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.