जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील ‘सेक्टर-एच’ मधील ‘फुडस् कंपनी’तून ४१ हजार रूपये किंमतीचे मशिनरी सामान चोरून नेणाऱ्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसीतून पोलीसांनी अटक केली आहे. न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राकेश गोकुळ राठोड, (वय-१९, रा.गणपती नगर जळगाव, किरण खुशाल रंगडे,(वय-३५, रा. खेडी बु ता. जळगाव आणि सुशील विनोद कोळी, (वय-२१, रा. तुळजाई नगर, कुसुंबा ता. जि. जळगाव असे अटक केलेल्या तिघा संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांना सोमवारी, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी एमआयडीसीतून पोलीसांनी अटक असून न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर महिती अशी की, “किशोर रमेश कटारिया (वय-३८) रा. गणपती नगर जळगाव यांचे एमआयडीसीतील सेक्टर एच-२२ मध्ये ‘एस.एस.डी. फुडस’ नावाची दाल कंपनी आहे. १ जानेवारी रात्री ८ वाजता ते २ जानेवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या कंपनीच्या आवारात असलेल्या लोखंडी मशीनरी यात मोटार, पुल्ली, लोखंडी स्टॅण्ड आणि मशिनची वायर असा एकुण ४१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय-२२) रा. मच्छी मार्केट सुप्रिम कॉलनी याने चोरून नेल्याचे उघडकीला आले होते.
याबाबत दिनकर चव्हाण याला २४ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. तर त्यांचे साथीदार फरार होते. याबाबत किशोर कटारिया यांच्या फिर्यादीवरून सोमवारी २४ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फरार असलेले संशयित आरोपी हे चोरीच्या उद्देशाने एमआयडीसी परिसरात फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुधीर सावळे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सुधीर सावळे, इम्रान सैय्यद, सचिन पाटील यांनी संशयित आरोपी राकेश गोकुळ राठोड, (वय-१९, रा.गणपती नगर जळगाव, किरण खुशाल रंगडे,(वय-३५, रा. खेडी बु ता. जळगाव आणि सुशील विनोद कोळी, (वय-२१, रा. तुळजाई नगर, कुसुंबा ता. जि. जळगाव यांना सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे. दुपारी न्यायालयात हजर केले असता ९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.