तरूणावर धारदार सुऱ्याने वार करणाऱ्या तिघांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मंदिराच्या परिसरात सिगारेट ओढणाऱ्यांना हटकल्याचा कारणावरून एका तरुणाला तीन जणांनी मारहाण करून लोखंडी सुऱ्याने वार करून जखमी केल्याची घटना बुधवारी २६ जून रोजी पहाटे ३ वाजता घडली होती. या गुन्ह्यातील तिघांना गुरूवार २७ जून रोजी रात्री ८ वाजता शहर पोलिसांनी शनीपेठ परिसरातून अटक केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मयूर धमदास सारवान वय-१९, अक्षय मुकेश अटवाल वय-२३ निलेश नरेश हंसकर वय-२३ तिघे रा. शनिपेठ जळगाव असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर आधार सोनवणे हा तरूण कानळदा रोडवरील रोहनवाडी येथे वास्तव्याला आहे. बुधवारी २६ जून रोजी पहाटे ३ वाजता ज्ञानेश्वर हा तरूण जळगाव रेल्वेस्थानकाजवळील हनुमान मंदीराच्या मोकळ्या जागेवर बसलेला होता. त्यावेळी अक्षय मुकेश अटवाल रा. शनीपेठ जळगाव मंदीराजवळ सिगारेट ओढत होता. त्यावेळी ज्ञानेश्वरने मंदिराच्या परिसरात सिगारेट ओढणाऱ्या अक्षयला हटकवले. या रागातून अक्षय मुकेश अटवाल यांच्यासह मयूर धमदास सारवान आणि निलेश नरेश हंसकर यांनी ज्ञानेश्वरला बेदम मारहाण केली. तर अक्षय अटवाल याने हातातील लोखंडी सुऱ्याने ज्ञानेश्वर वार करत त्याला जखमी केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्या दाखल झाल्यानंतर शहर पोलीसांनी गुरूवार २७ जून रोजी रात्री ८ वाजता कारवाई करत तिघांना शनीपेठ परिसरातून अटक केली आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र पाटील हे करीत आहे.

Protected Content